
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
जालना प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार आदिवासी भटके विमुक्त समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचा दिनांक ११/२/२०२३ रोजी दु ३ वा फ्लोराईन होटेल जालना येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा आदिवासी व भटके मुक्त समितीचे राज्य समन्वयक मा.प्रा.किसन चव्हाण, प्रा.विष्णू जाधव, मा.अनिल जाधव,डॉ.ॲड. अरुण जाधव ,जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ, तसेच जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे पश्चिम व जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने पूर्व , महिला जिल्हाध्यक्ष रमाताई होर्शिळ, जालना पुर्व कार्याध्यक्ष परमेश्वर खरात हे उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यात आदिवासी भटके विमुक्त समाजातील कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी तसेच या समूहाशी निगडित असणारे गायरान जमिनीवरील अतिक्रमण यांच्यावर होणारे अन्य अत्याचार राजकीय जागृती यासारख्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा व विचारविनिमय करून तो प्रश्न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे तरी जालना जिल्ह्यातील पूर्व पश्चिम जिल्हा, शहर, तालुका महिला व पुरुष पदाधिकारी यांनी आपापल्या जवळच्या आदिवासी, भटक्या समाजातील व्यक्तीना घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जालना जिल्हा महासचिव प्रा संतोष आढाव यांनी केले आहे.