
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबीरात ५० महिलांची मोफत तपासणी
माहेर मॕटनिटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटर उदगीरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजसेवावृत्तीने कार्य करणाऱ्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे यांनी सोमवारी दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत महिलांसाठी सर्वरोग निधन मोफत तपासणी व औषधी वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीराअंतर्गत ५० महिलांची मोफत रक्त तपासणी, सोनोग्राफी, हाडातील ठिसुळपणाची तपासणी, महिलांच्या शरिरातील या शिबीरात दुर्बिणीव्दारे कँन्सर निधन, महिलांच्या शरिरातील रक्त व लोह प्रमाण तपासणी, थॉयराईड तपासणी, विविध रोगनिधन निशुल्क तथा मोफत करण्यात येवून मोफत औषधी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे हे होते. या मोफत शिबीराचे उद्दघाटन मुख्यअतिथी उदगीरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.डी.सुभेदार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबीरास प्रमुखअतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शशिकांत देशपांडे, उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.दत्ताञेय पवार, धन्वतंरी आयुर्वेद्रिक कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्ता पाटील, ओम डायग्नोस्टीक सेंटरचे संचालक तथा प्रसिद्ध समाजसेवी रेडिओलॉजिस्ट डॉ.नितीन गुरूडे, डॉ.वर्षा वैध, डॉ.शबाखान परभणीकर, डॉ.शबाना पटेल, अॕड.राजकुमार नावंदर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर उपस्थित होते. या शिबीराचे प्रास्तविक व आभार प्रदर्शन माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.डी.सुभेदार म्हणाले की, समाजसेवावृत्तीच्या प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ तथा वंध्यत्व निवारण सेंटरच्या कॉल्पोस्कोपी तज्ञ डाॅ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे या सर्वसामान्य महिलांचे आरोग्य उत्तमपणे व तन दुरूस्ती राहावे यासाठी समाजसेवावृत्तीने वैधकिय क्षेत्रात निस्वार्थी भावनेने गेल्या अनेक वर्षांपासून सतत कार्यरत आहेत. त्यांनी वैधकिय क्षेत्रातील मोठ्या पदव्या चांगल्या गुणांनी ऊर्तीण होऊन ऊत्कृष्टरित्या सांभाळत वैधकिय क्षेत्रातील आपल्या उच्च शिक्षणाचा लाभ सर्वसामान्य गोरगरिब, गरजूवंत महिलांना, लोकांना व्हावा यासाठीच माहेर मॕटर्निटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटरच्या व ओम डायग्नोस्टीक सेंटरच्या माध्यमातून त्या नेहमीच निःशुल्क तथा मोफत सर्वरोग निदान शिबीर व औषधी वाटप शिबीराचे आयोजन करित असतात.यासाठी डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे यांचे पतीदेव समाजसेवावृत्तीचे ओम डायग्नोस्टीक सेंटरचे संचालक रेडिओलॉजिस्ट डॉ.नितीन गुरूडे यांचे करावे तितके कौतुक खुप कमी आहे. याचा मला अभिमानही वाटतो. शिबीरात उपस्थितीत महिलांनी विविध आजाराने ग्रस्त रूग्णांनी माहेर हॉस्पिटल अंतर्गत मोफत रोगनिधन शिबीरांचा फायदा घ्यावा,असे मत जिल्हासत्र न्यायाधीश पी.डी.सुभेदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
शिबीर यशस्वीतेसाठी माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलचे सर्व महिला, पुरूष कर्मचारी वर्ग, नसेर्स यांनी विशेष प्रयत्न केले.