
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
९१ मुखेड (नांदेड ) दापकाराजा ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवासी असलेल्या अतिशय कष्टाळू शेतकरी कुटूंबातील कु. सृष्टी बालाजीराव पाटील जोगदंड ची आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नांदेडची सुवर्णकन्या मराठवाडा एक्सप्रेस नावाने ओळखली जाणारी कु. सृष्टी बालाजीराव पाटील जोगदंड ची १४ ते १९ मार्च २०२३ दरम्यान चायनीज ताइपेयी येथे आयोजित एशिया कप वर्ल्ड रँकींग टूर्नामेंटसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सदरील स्पर्धेसाठी भारतीय खेळ प्राधिकरणाच्यावतीने साई सोनीपत येथे ६ ते ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उच्चतम कामगिरी करत एलिमिनेशन सह राऊंड रॉबिनमध्ये वेस्ट बंगालच्या आदिती जयस्वाल,
किनारा तुला पामराला
आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या आशा आकांक्षाची सृष्टी निर्माण करून साता समुद्रापार देशाचा
तिरंगा हाती घेवून धनुर्विद्येचे भारताचे नेतृत्व करणार आहे. या यशाबद्दल मुखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार
हरियाणाच्या तनिष्का वर्मा, किरण व राजस्थानच्या खुशी कुमावत यांना हरवत भारतीय संघात स्थान प्राप्त करीत सृष्टी नांदेडच्या इतिहासातील पहिली आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू ठरली आहे. लहानपणापासून प्रशिक्षिका तथा आई वृषाली पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शना खाली धनुर्विद्येचे धडे घेणाऱ्या सृष्टीने सलग चार वर्ष शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम केला आहे. नांदेडच्या खेळाडूंनी ऑलंपिक स्पर्धा खेळाव्यात या हेतूने पछाडलेल्या वृषाली पाटील यांनी आपल्या एकमेव मुलीला धनुर्विधा खेळासाठी वाहिले असून त्यावर तंतोतंत खरे उतरत सृष्टी जोगदंड ने आपली निवड सार्थ केली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून सृष्टीवर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनंत आमुची ध्येयाशक्ती अनंत अन् आशा
डॉ. तुषार जी राठोड, मराठवाडा भूषण डॉ. दिलीपजी पुंडे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव
पाटील बेटमोगरेकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष यशवंत बोडके, शिवाजी इंगोले, सदाशिवराव पाटील, रामदास पाटील, मुखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, सचिव विजय बनसोडे, दैनिक लोकराज्य चे संपादक ज्ञानेश्वर डोईजड, श्रमिक लोकसंकेतचे संपादक नामदेव यलकटवार, जिल्हा पत्रकार संघाचे संघटक संदीप कामशेट्टे, दैनिक चालु वार्ता मुखेड(ग्रा) प्रतिनिधी शिवकुमार बिरादार जि.प. मुलींचे हायस्कूलचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहताब शेख, मायबोली मराठी परिषद मुखेड संस्थापक अध्यक्ष शिवाजी अंबुलगेकर, संस्थापक सचिव ज्ञानोबा जोगदंड, अध्यक्ष डॉ. रामकृष्ण बदने, सचिव एकनाथ डूमणे, जिजाऊ ज्ञानमंदिर मुखेड संचालक जगदीश जोगदंड, जगदिप जोगदंड
सहशिक्षक सुरेश जमदाडे, मोहन अंदुरे, राजमाता जिजाऊ होस्टेलचे संचालक, गंगाधर बिरादार,
, सुधाकर जोगदंड, दापका राजा चे सरपंच संतोष दापकेकर, उपसरपंच अरुण जोगदंड, गणेश मोरे, अॅड. आनंद जोगदंड, व्यंकट जोगदंड आदींनी अभिनंदन केले आहे.