
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड // प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त मूखेड येथे युतीच्या कार्यकृत्याच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत गुरुवार रोजी उपजिल्हा र रुग्णालय मुखेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते. विवीध प्रकाराचे आजार आणि त्यावरील उपचार या अनुषंगाने रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत असते. वेळेवर उपचार आणि त्यानुसार रक्ताची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने विविध संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन केली जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या आवचित्य साधून | रक्तदान शिबिराचे आयोजन युतीतील कार्यकृत्या मार्फत करण्यात आले होते. या रक्तदान शबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवले होते, यावेळी भाजपाचे आमदार डॉ. तुषार राठोड, बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर, व्यंकटराव लोहबंदे, भाजपा तालूका अध्यक्ष डॉ. विरभद्र हिमगीरे, खुशालराव पाटील उमरधरीकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, डॉ. सुभेदार, अनिल शिरसे रिपब्लिकन सेना जिल्हाअधक्ष, बजरंग कल्यानी, रवी गंदपवाड, डॉ कदम, सचिन रिंदकवाले, भवानीसिंह चौहान, सुधीर चव्हाण, अनिकेत कांबळे, सतीश डाकुरवार, पत्रकार संदीप कामशेट्टे, मोरे पाटील, विनोद दंडलवाड, करण रोडगे, खाजा भाई धुंदी, पत्रकार मेहताब शेख, छायाचित्रकार गणेश आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.