
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी;तालुक्यातील चिस्तुर येथील मूळ रहिवासी बसवाहक संदीप प्रभाकर झटाले(३९) यांचा पहाटे ५:३० वाजता दरम्यान अमरावती नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वर मृत वराहला दुचाकीची धडक बसून अपघातात मृत्यू झाला याबाबत प्राप्त माहितीनुसार मृत बसवाहक संदीप झटाले १५ कि.मी. वर असलेल्या तिवसा येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते ते तळेगाव (श्या.पंत) बस आगारात वाहक म्हणून कार्यरत होते ते दुचाकीने कर्तव्यावर रुजू होण्यासाठी पहाटे जात असताना महामार्गावर मृत पडलेल्या वराहला त्यांच्या दुचाकीची धडक बसली आणि बसवाहक जागीच ठार झाले त्यांच्या पश्चात आई,वडील, नोकरदार पत्नी, मुलगा सार्थक(५)मुलगी आरू(३)विवाहित भाऊ असा आप्त परिवार आहे मृत बसवाहक संदीप झटाले यांनी जिद्दीने व कष्टाने शिक्षण घेवून स्वतः नोकरी मिळवली आणि पत्नीही शासकीय नोकरदार अश्या सुखवस्तू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे