
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- सिरसी बु.ता.कंधार येथील गावाअंतर्गत येणाऱ्या जोडरस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.स्वातंत्र्य मिळवून बरेच वर्षे झाली आहेत.परंतु या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता आता पर्यंत झाला नाही.बाजार, दवाखाना,शाळा, महसूल कार्यालय येथे जाण्यासाठी पक्का रस्ता लवकर पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.सिरसी बु.ते सिरसी खुर्द रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण तसेच राहटी ते सिरसी बु.आणि सिरसी बु नवीन वसाहत ते मंगनाळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडे मागणी श्री.व्यंकटी जाधव, श्री.पांडुरंग कंधारे, श्री.प्रकाश टेबुलवार , श्री.शरद गायकवाड, श्री.बळीराम गायकवाड यांनी मागणी करून काम लवकर चालू करण्याची विनंती खासदार साहेबांना केली आहे.