
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -मीर मुल्ला
छञपती शिवरायांनी उभारलेले स्वराज्य हे अठरापगड जातीचे होते दंगल मुक्त महाराष्ट्र घडवायचा असेल तर शिवचरित्र घरा घरात पोहोचले पाहिजे असे मत प्रसिद्ध शिव व्याख्याते बनबरे यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आयोजित शिवजयंती उत्सवा निमित्त कळंब येथील शिवजयंती मंडळाचा व गुणवंताचा शिवसन्मान सोहळा निमित्त जाहीर व्याख्यान प्रसंगी बोलत होते, यावेळी बनबरे म्हणाले की, स्वायत्त संस्था या लोकशाहीची बलस्थाने आहेत.मात्र स्वायत्त संस्था राजसत्तेच्या बटिक होत आहेत.जाणीवपूर्वक महापुरुषांची बदनामी शिवप्रेमी म्हणून आम्ही सहन करणार नाही असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.त्यानंतर शिवजयंती मंडळाचा सन्मान करण्यात आला यामध्ये सकल मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे बाळासाहेब कथले, शिवसेवा तालीम संघाचे संजय घुले,गोविंद चौधरी,रोहन पारख,श्रीमंतयोगी युवा मंच चे रोहन कुंभार, जाणता राजा सामाजिक संघाचे विश्वजित भापकर,अनिल क्षीरसागर, सम्राट ग्रुप चे अजय जाधव,स्वराज्य ग्रुप चे पापा काटे,शिवकुमार खबाले,आनंद काळे व आदींचा सन्मान करण्यात आला
यावेळी धाराशीव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास दादा पाटील, तालुका अध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड साहेब, संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे, अतुल भैय्या गायकवाड, डाॅ.पुरुषोत्तम पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष अॅड तानाजी चौधरी, दत्ता भाऊ कवडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य जगदीश गवळी सर, तालुका अध्यक्ष अनिल फाटक मा.तालुका अध्यक्ष संदीप शेडंगे सर ता. सचिव अरविंद शिंदे सर, ता. संघटक शरद सुर्यवंशी सर,संजय होळे, सागर बाराते, विलास गुठांळ, छञपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड कळंब तालुका अध्यक्ष इम्रान मिर्झा, संभाजी ब्रिगेड चे आमोल पवार,संजय काकडे, आशोक भैय्या कांबळे, शरद जाधव, शुभम पवार मुन्ना वाघमारे ,दादा माळी बालाजी डीगे, सुग्रीव खापे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रतिक गायकवाड यांनी केले.