
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / पोखरभोसी :- उस्माननगर येथून जवळच असलेल्या पोखरभोसी येथे दि. २२ फेब्रुवारी रोज बुधवार ह्या दिवशी
रयतेचे राजे ,बहुजनांचे कैवारी,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदविस्वराजाचे संस्थापक, राजाधिराज छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त पोखरभोसी ता.लोहा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले हेते. यास रक्तदात्य दानशूरांनी
एकून( ४५ )तरूणांनी रक्तदान करून उस्फुर्त प्रतिसाद दिला.( यामध्ये दोन भारतीय सैनिकांचा समावेश होता ) या उपक्रमाला रक्तपेढी जिवन आधार ब्लड बँक नांदेड यांचा सहभाग होता.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.एकनाथ उर्फ अनिल मोरे ( सिने अभिनेता ) तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरी मुळे ,छावा तालुका अध्यक्ष श्री ताटे पाटील, सरपंच सौ. मीरा कैलास गिरी, उपसरपंच फुलाजी पाटील ताटे ,ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कांबळे, माजी मुख्याध्यापक भगवान पाटील ताटे, पत्रकार विठ्ठल पाटील ताटे, माजी पोलीस पाटील विश्वनाथ पाटील ताटे सौ.शिंदे मॅडम, कुंभारगावे, शेषेराव सुर्यवंशी, जेष्ठ नागरिक नारायण पाटील ताटे,गणपती ताटे,बालाजी पा. डांगे, भारतीय सैनिक दलाचे सैनिक बालाजी ताटे,शरद ताटे ,पार्वतीबाई ताटे,सत्वफुलाबाई गिरी,साहेबराव ताटे,व जयंती मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील डांगे , ॲड. सतीश पाटील ताटे,सरपंच प्रतिनिधी कैलास गिरी व जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सौ. मनकर्णाताई भगवान ताटे यांनी जिजाऊ वंदन गीत गाऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
व छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनावर प्रमुख पाहूणे व अध्यक्ष यांनी भाषणे केली . यावेळी गावातील महिला , पुरुष , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यांनी मिरवणूक टाळ,मृदंगाच्या निनादात फळा ता .पालम येथील वारक-यांनी शिवनामाचा व हरिनामाचा गजर करत तसेच जिल्हापरिषद प्राथमिक शाळा पोखरभोसी येथील विद्यार्थ्यी, विद्यार्थिनी यांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते. गावातील सर्व जाती धर्मातील युवक व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.व महिलांनी पारंपारीक फुगडी व पाऊले खेळून सहभाग घेतला.व तरूणानी शिवाजी महाराज याच्या गाण्यावर भेभामन होवून नाचू लागली .मिरवणूक अगदी उत्साहात पार पाडली .मिरवणूक विसर्जन झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.हा जयंती सोहळा यशसवी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील डांगे ,उपाध्यक्ष स्वप्नील ताटे,सचिव श्रीनिवास पाटील ताटे,शरद पाटील ताटे( सैनिक) ,राम पाटील वरपडे,हनमंत पाटील ताटे,सुभाष पाटील ताटे,ऋषिकेश पर्बत, व गावातील नागरिकांनी अतिशय परिश्रम घेऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक भगवान पाटील ताटे,सुत्रसंचलन व्यंकटी बळीराम पाटील ताटे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन पाटील डांगे यांनी मानले.