
दैनिक चालु वार्ता म्हसळा –रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाणाचे’ महामोहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे रेवदंडा यांच्या मार्फत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी,डॉ.सचिन धर्माधिकारी,उमेश धर्माधिकारी,राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा शहरात स्वच्छता मोहीम यशस्वी झाली.प्रतिष्ठाणचे ५४४ श्री सदस्यानी प्रत्यक्ष सहभाग घेत म्हसळा शहरातील सर्व शासकिये कार्यालय,ग्रामीण रुग्णालय परिसर,बस स्थानक परिसर,विश्रामगृह,प्राथमिक आरोग्य केंद्र,सार्वजनिक वाचनालय,पाभरे चेक पोस्ट ते पेट्रोल पंप पर्यंत शहरातील मुख्य रस्ता,कन्या शाळा,स्टेट बँक,बँक ऑफ इंडिया परिसर,पानपोई, मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली.याच मोहिमेत प्रतिष्ठानने स्पॉन्सर केलेले बॅरिकेट्स स्वच्छ करण्यात आले.स्वच्छता मोहीमेत तहसिलदार घारे,गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ,नगराध्यक्ष अहसल कादिरी,डॉ.महेश मेहता,डॉ.प्रशांत गायकवाड,नगरसेविका राखी करंबे,अंजुमन स्कूल चेअरमेन नासीर मिठागरे,नंदकुमार सावंत,शशिकांत शिर्के,उदयकुमार कळस,अजय करंबे,पंचायतीचे कर्मचारी,अधिकारी,विविध संघटनेचे सर्व सदस्य प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते.स्वच्छता मोहिमेत गोळा केलेला कचरा शहराच्या डपिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला.स्वच्छ्ता मोहिमेत सुका कचरा १५ टन आणि ओला कचरा ५ टन गोळा झाल्याचे श्री सदस्यांनी माहिती देताना सांगीतले. कचरा विघटन करुन वाहतूक करण्यासाठी ४ ट्रॅक्टर ३ पिकअप,४ घंटागाडी आणि ५४४ श्री प्रतिष्ठान सदस्यानी सहभाग घेतला होता.शेकडो हात एकत्र आल्याने म्हसळा शहर, कार्यालये चुटकी सरशी स्वच्छ करण्याचे महान कार्य डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केले आहे.आजवर जे कार्य कोणालाच जमणार नाही ते कार्य प्रतिष्ठानने केल्याने आम्हाला मनस्वी आनंद होत असल्याचे कौतुक नागरिकांनी केले आहे.
**प्रतिष्ठानचे कार्य आम्हा सर्वाना स्वच्छतेचा संदेश देणारा आहे. आपली नगरपंचायत स्वच्छतेचे काम करते त्याला प्रतिष्ठानने लावलेला हातभार हा आम्हाला स्फुर्तीदायक आहे. सकाळ पासून प्रतिष्ठान च्या सदस्यांनी संपूर्ण शहर स्वच्छ करून निरोगी आयुष्य जगण्याची जणू नवसंजीवनीच निर्माण करून दिली आहे. त्या बद्दल प्रतिष्ठान चे अध्यक्ष संस्थापक पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ सचिनदादा धर्माधिकारी यांचे आम्ही नगरपंचायत संपूर्ण तालुका आभार व्यक्त करत आहोत.
मुख्याधिकारी नगर पंचायत म्हसळा
मनोज विष्णूपंथ उकिर्डे
**डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आप्पासाहेबांचे समाजकार्य हे जगाला वंदनीय आहे त्यांच्या कार्याची महती शब्दात सांगता येणार नाही.प्रतिष्ठान मार्फत देशात आणि देशाबाहेरही सामाजोपयोगी काम निस्वार्थ व अविरत गेली अनेक दशके सुरु आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण नव्हे तर सर्व श्रेष्ठ भारतरत्न पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा सन्मान करावा अशी मागणी शासनाकडे करणार आहोत.
नगराध्यक्ष नगर पंचायत म्हसळा
असहल कादिरी