
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कंधार तालुक्यात सध्या अनेक महापुरुषांच्या जयंती साजऱ्या होत आहेत,या निमित्त शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले असून नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा फोटो बॅनर वर नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
विद्यमान भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा फोटो भाजपाच्या बॅनरवरून गायब असल्याचं दिसून आलं.श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत श्री सेवालाल महाराज जयंती यांच्या हार्दिक शुभेच्छाचे बॅनर शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी एकनाथ पवार भाजप प्रवक्ते महाराष्ट्र राज्य तथा संस्थापक अध्यक्ष सूर्योदय मन्याड फाउंडेशन तर्फे त्यांच्या समर्थकांनी लावले असून त्यामुळे तालुक्यात बॅनरवरून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.
विशेष बाब म्हणजे ह्या बॅनरवर लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, मुखेडचे आमदार डॉ.तुषार राठोड यांचाही फोटो आहे फक्त खासदार प्रताप पाटील चिखलीकर व त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही फोटो नसल्यामुळे भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी उपळली की काय ? अशी चर्चा होताना दिसत आहे.
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, व लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपा मध्ये दोन गट पडतात की काय? असेही बॅनर वरून चर्चा होताना दिसत आहे. एकनाथ पवार ही भाजपाकडून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करीत मोर्चबांधणीला सुरुवात तर केली नाही, ना ? अशा तर्क वितर्कमुळे तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.