दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
सुरुवातीला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या कै.सुलभाताई दोंदे यांच्या जयंतीनिमित्त फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
यानंतर उपस्थित अखिल म्हसळा प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी अध्यक्षा तथा पेण पतपेढी संचालक सौ सुमित्रा खेडेकर, उपाध्यक्ष संगिता निरणे, पनीता गावीत,योगीता पारधी,सौ साठे यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम आयोजित केले बद्दल आयोजकांना धन्यवाद देताना सौ साठे यांनी महिला दिनाचे महत्त्व, जुन्या रुढी परंपरा यावर आधारित काही उदाहरणे दिली.सौ संगिता निरणे यांनी आपल्या मनोगतात सुलभाताईंनी महिलांसाठी केलेल्या विविध कामांची माहिती दिली.तर सुमित्रा खेडेकर यांनी आज महिलांचि सन्मान केलेबद्दल संघटनेला धन्यवाद दिले.
यावेळी जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष श्री किशोर मोहिते, तालुका संघाचे सल्लागार दिनेश पाटील, सचिव रमेश जाधव, उपाध्यक्ष विजय घाटगे, शिवाजी चव्हाण, भानुदास राठोड उपस्थित होते.
