
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक -मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्यांच्या याच मागणीचे समर्थन करत आता केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विधानावरून आता आणखीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
औरंगजेबाची कबर खुलताबाद येथून हलवून हैदराबाद येथे हलवली पाहिजे, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले असल्याचा प्रश्न कराड यांना विचारण्यात आला. यावर बोलताना कराड म्हणाले की, संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया मी टीव्हीवर आयकली असून, त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी खरच बोलले आहे. औरंगजेबाची कबर ही हैदराबाद हलवा हे खरं असून, त्याचे मी समर्थन करतो. पण लगेचच त्यांनी यु टर्न घेत, शिरसाट यांना असे म्हणायचे होते की, जे खासदार हैदराबादचे आहेत त्यांना येथे रोप आलाय त्यांना आता परत पाठवा.
कराड म्हणाले की, माझे मुस्लीम बांधव कधीही औरंगजेबाला सपोर्ट करत नाही. खासदार इम्तियाज जलील फक्त राजकारण करत आहेत. तर जलील आणि नामांतराच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांच्या घरातील किती लोकांची नावं औरंगजेब आहेत. त्यामुळे मुस्लीम लोकांना औरंगजेबाबद्दल कोणतेही सहानभूती नाही. तर औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार असे म्हणणाऱ्या जलील यांना यासाठी बिहारच्या औरंगाबादमध्ये जावे लागणार असल्याचे देखील कराड म्हणाले.