
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:’बीआरएस’च्या शेतकरी हिताच्या धोरणांमुळे सत्ताधारी व विरोधकांना कामे लागली आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने किसान सन्मान निधीत केंद्र सरकारच्या ६ हजार रुपये अनुदानाच्या जोडीला राज्य सरकारचे अधिकचे ६ हजार रुपये प्रतिवर्षी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तर नांदेडमधून ‘बीआरएस’ने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री मारली अन् किसान सन्मान निधीत वाढ झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
उन्हासोबतच महागाईचे चटके
उन्हाळ्याची चाहूल लागली असूनएकीकडे उन्हाळ्याचे चटके बसत असतांना वाढत जाणाऱ्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढत आहे. १०९० रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी ५० रुपयांची वाढझाली.
‘उज्ज्वला’ सापडली अडचणीत…..
महागाईत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. धुरापासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे थाटात वाटप केले. मात्र गॅस दरवाढीमुळे या योजनेच्या लाभार्थी महिला पुन्हा चुलीकडे वळत आहेत. काय चूक आहे सीमावरती भागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी तेलंगाना राज्यमध्ये आपला समाविष्ट व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यात आहेत. यासाठी शासनाने सीमावरती भागातील शेतकरी व नागरिकांना विशेष पॅकेज देऊन त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न शासनाने नक्कीच केला पाहिजे.