
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख. बीड/अंबाजोगाई –अंबाजोगाई तालूक्यातील अंजनपुर कोपरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळा आजपासून सुरू होत असून या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे अवाहन आयोजकांच्या वतिने केले आहे .अंजनपुर कोपरा तालुका अंबाजोगाई येथील अंजनपूर कोपरा व पंचक्रोशीतील नागरीकांचे श्रद्धास्थान असलेले श्री काळभैरगनाथ देवस्थान असून विसाव्या शतकातील महान संत सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकरवाडी व ब्र.भु.नागोबा अप्पा महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने अंजनपूर कोपरा येथील श्री काळभैरगनाथ मंदिर कलशारोहणा निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १७/०३/२०२३ वार शुक्रवार ते दिनांक २४/०३/२०२३ वार शुक्रवार पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या मध्ये दैनदिन कार्यक्रम काकडा आरती, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीराम कथा, हरिपाठ, किर्तन, रात्री संगीत भजन व हरिजागर. असे विविध कार्यक्रम होणार असूल दिनांक १७/०३/२०२३ वार शुक्रवार ते दिनांक २३/०३/२०२३ पर्यंत श्री राम कथा होणार असून कथा प्रवक्ते ह.भ.प.गु.विद्वत्ताप्रचुर रामायणाचार्य श्री रामरावजी ढोक महाराज यांची असून रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत किर्तन होणार आहेत या मध्ये गुरुवर्य तपोनिधी) ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्री.ह.भ.प.महन्त महादेव महाराज बोराडे शास्त्री(जगद्गुरू तुकोबाराय मंदिर पावणधाम)
ह. भ. प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड (गुरुजी)(भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ)ह.भ.प. किसन महाराज पवार
(आद्य कवि मुकुंदराज भजनी मंडळ अध्यक्ष अंबाजोगाई) श्रद्धेय ब्रम्हनिष्ठ, विदर्भरत्न, गोपालक रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर (आकोला)किर्तनकेसरी ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर युवा किर्तनकार ह.भ.प. अविनाश महाराज सुर्यवंशी (बर्दापूरकर )
संतपीठाचार्य श्री ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले(संतपीठ श्री क्षेत्र पैठण तथा राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा. वा. मं यांचे किर्तन होणार आहे तसेच दिनाक.२४रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विद्वत्तप्रचुर रामायणाचार्य ह.भ.प. श्री. रामरावजी ढोक महाराज, नागपुरकर यांचे काल्याचे किर्तन होनार असुन या कार्यक्रमाचा भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे .या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भावीक भक्ताची व नागरीकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होवू नये म्हणून आसन व्यावस्था,भोजन व्यावस्था, पार्कींग व्यावस्था,मुबलक पाण्याची व्यावस्था आयोजकांनी केली असून अंदाजे पंधरा ते विस एकर मध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळा होत असून या कार्यक्रमाचा बिड लातूर उस्मानाबाद येथील भावीक भक्त व नागरीकानी याचा लाभ घेण्याचे अवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .