
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी नांदेड-
नांदेड/विष्णूपुरी :- सरकारने शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, तात्काळ २००५ नंतरच्या सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी यांना जुनी पेंशन मंजूर करावी.- डॉ. उत्तमराव सोनकांबळे.
(महासचिव, श्री. भारत वानखेडे प्रणित मंत्रालय संघटना मुंबई तथा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश)२००५ नंतर च्या शासकीय कर्मचारी – अधिकारी यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी सबंध कै. डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील सर्व सिस्टर, वॉर्ड बॉय, आरोग्य सेवक, नर्सेस व दवाखान्यातील सर्व कर्मचारी – अधिकारी यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद या आज पुकारलेल्या संपला होता.
यावेळी मंत्रालय संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपले प्रखर विचार मांडले.