
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांची २६ मार्च रोजी बैल बाजार मैदानावर जाहिर सभा असल्याची माहिती शेतकरी नेते माजी आ. शंकर आण्णा धोंडगे यांनी शासकीय विश्रामगृह येथील पञकार परिषदेला माहिती दिली. बि.आर.एस पक्षाचे धोरण समजुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील व इतर पक्षांतील पदाधिकारी या सभेत जाहिर प्रवेश करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रतील सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. तेलंगणा छोटे राज्य असुन अनेक योजना त्या राज्यात राबवल्या जातात मग आपल्या राज्यात का ? राबवल्या जात नाहीत. तेलंगणातील बि.आर. एस पक्षाचे धोरण सर्व सामान्यांच्या हिताचे आहे, म्हणुन आम्ही सर्व पदाधिकारी मिळुन बी. आर. एस पक्षात केला आहे.
महाराष्ट्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे . सुशिक्षीत तरुण वर्ग उदासिन आहे.
राज्यातील शेतकरी, कष्टकरी व हैराण झाला आहे, पण शेजारचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, उपस्थित होते.
कष्टकरी व मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविलेल्या आहेत, म्हणुन बि. आर एस पक्ष तेलंगणात तळागळात रुजला आहे . म्हणुनच त्या राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे महाराष्ट्रातही तेलंगानाच्या धर्तीवर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा शेतक-यांना संघटीत करुण सर्व सामान्यांचे धोरण राबवण्याचा संकल्प केला आहे आसे शेतकरी नेते, माजी आ. शंकर अण्णा धोंडगे यांनी माहिती दिली.
शेतक-याच्या हिताचे असलेले तेलंगाना मॉडेल कसे आहे हे येथील जनतेला माहिती सांगण्यासाठी तेलंगणा राज्य चे मॉडेल जनक भारत राष्ट्र समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखरराव यांची २६ मार्च रोजी रविवारी बैल बाजार मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला लाखो जनसमुदाय उपस्थिती राहील असा विश्वास. शंकर अण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.
यावेळी जि.प.चे माजी सभापती दिलीप दादा धोंगडे, दत्ता पवार, मनोहर भोसीकर, शिवदास महाराज धर्मापुरीकर, छजू महाराज अजय हंकारे याच्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.