
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार/पेठवडज :-कंधार तालुक्यातील पेठवडज संपूर्ण सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठवडज, मंगनाळी, कळका, वरवंट, राहटी,सिरसी बु. सिरसी खुर्द तसेच पेठवडज सर्कलमध्ये मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधवांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.