
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/कौठा :- ग्रामपंचायत कार्यालय कौठा येथील ग्राम विकास अधिकारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिवाजी पानपट्टे यांची कंधार पंचायत समिती विस्तार अधिकारी पदि निवड करण्यात आली आहे
कंधार तालुक्यातील काटकंळबा येथील रहिवासी कौठा ग्राम पंचायतीचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी शिवाजी पानपट्टे १८ डिसेंबर १९९० रोजी ग्रामसेवक म्हणून पंचायत समिती बिलोली येथे रुजू झाले १९९४ पंचायत समिती कंधार अंतर्गत ९४ ते ९६ बारूळ ग्रामपंचायत १९९६ ते २००८ ग्रामपंचायत कौठा चौकीमहाकाया शिरूर २००८ ते २०१६ पंचायत समिती लोहा अंतर्गत माळेगाव माळाकोळी ग्रामपंचायत २०१६ते २०१९ पंचायत समिती किनवट अंतर्गत इस्लापूर ग्रामपंचायत पुन्हा २०२० ते २०२३ पासुन कौठा ग्राम पंचायत येथे कार्यरत आहेत २००७ मध्ये चौकीमहाकाया ग्राम पंचायतीस निर्मल ग्राम पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना मिळाला आहे.त्याच्या निवडी बद्दल संजय देशमुख, मारोतीराव पाटील कलंबरकर,पत्रकार राजेश पावडे, मारोती कदम ,सदाशिव वाकोरे, शिवराज जाधव, माधव जाधव, आदिने शुभेच्छा दिल्या आहेत.