
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील बौध्द_नगर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची कार्यकारणी नूकतीच घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी आयु.सिध्दार्थ(बबलू) वाघमारे यांची उपाध्यक्षपदी आयु.विठ्ठल ससाणे तर सचिव पदी आयु.बबलू वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या नूतन कार्यकारिणीचे युवकनेते तथा प्रभागाचे माजी नगरसेवक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.तसेच या वर्षीची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी करण्यासाठी सर्व युवकांनी पुढाकार घ्यावा असे अवाहन केले.
या प्रसंगी माधवराव तिगोटे,संविधान कदम,बबलू वाघमारे, सुनिल तिगोटे, सिद्धार्थ(डाॅन) वाघमारे, संगमेश्वर बनसोडे,अनिल वाघमारे,शंकर वाघमारे, आकाश ससाणे,सतीश कदम, रोहिदास तिगोटे, दिनेश तिगोटे,मिलिंद कदम, विठ्ठल ससाणे, अनिल तिगोटे,सोनू कांबळे,विशाल कदम, भैयासाहेब सोनकांबळे, राजू गुळवे,सुमित बनसोडे, राजवीर मतकर,अभिषेक ससाणे,दिलीप सोनकांबळे, गौसभाई शेख,प्रथमेश ससाणे,आकाश ससाणे, सिध्दार्थ वाघमारे, रवी कांबळे,प्रतीक ढवळे, बालाजी हणमंते,शंकर वाघमारे,रितेश रायभोळे, अभय गायकवाड,अभय गुळवे, साई कांबळे, अभिषेक ससाणे,बिट्टू ढवळे,लखन जाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती_सोहळा_2023 सत्कार नूतन_कार्यकारीणी बौध्द_नगर