दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
भूम:- ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तत्वान महिलांचा सन्मान केला. त्यामध्ये भूम येथिल सत्यमेव जयते अपंग महिला बचत गटाच्या चित्रा मसाले उद्योगाचा स्वर्गीय सुषमा स्वराज स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अधिक अधिक माहिती की, मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या सूचनेवरून व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव येथील प्रतिष्ठान भवनमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या , सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या, उद्योग व्यवसायात उत्तुंग अशी भरारी घेणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा माजी केंद्रीयमंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज स्मृती पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे, प्रदेश समन्वयक वैशालीताई गुंड, सोलापूर अलकाताई मगर, तुळजापूर पंचायत समिती सभापती रेणुकाताई इंगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ अस्मिताताई कांबळे, लीगल सेलच्या अध्यक्षा कल्पनाताई निपाणीकर, तसेच जिल्हाधिकारी सौभाग्यवती अस्मिताताई
ओबाशे, पोलीस अधीक्षक सौभाग्यवती महिमाताई कुलकर्णी, डॉक्टर विधाते मॅडम, डॉक्टर गवळी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भरगच्च जागतिक दिनाच्या कार्यक्रमांमधून भूम येथील चित्रा नर्सिंग शिंदे यांच्या नेतृत्वात उद्योग व्यवसाय क्षेत्रात चित्रा मसाले उत्पादित व्यवसाय करणाऱ्या सत्यमेव जयते अपंग महिला बचत गटाला स्वर्गीय सुषमा स्वराज स्मृती पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी चित्रा नर्सिंग शिंदे, सुरेखा लक्ष्मण सीतापे, लक्ष्मी दीपक सीतापे, रतन कालिदास सीतापे, शिवाय शशिकांत विठ्ठल मुळे , महादेव अभिमान सगर यांचा प्रमुख सहभाग होता. याशिवाय वालवड तालुका भूम येथील ग्रामीण भागातील डाळ मिल चालवणाऱ्या वृंदावनी यादव यांचाही अशाच प्रकारे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या कार्यक्रमा दरम्यान चित्रा मसाले या उत्पादित ब्रँडचा उपस्थित सर्वच प्रमुख महिलांनी भरभरून कौतुक करून व्यवसाय उद्योगाला शुभेच्छा दिल्या, चित्रा मसालेच्या माध्यमातून चहा मसाला, मिसळ मसाला, कोकणी मसाला, पाव भाजी मसाला, काळे तिखट मसाला, लाल मिरची मसाला, पावडर मसाला, संडे मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, कांदा लसूण मसाला , मटन मसाला, बिर्याणी मसाला, गोड मसाला, चटणी मसाला, आणि कोल्हापुरी मसाला अशा एकूण पंधरा प्रकारचे मसाले तयार केले जातात,
याशिवाय शेंगदाणा चटणी, कारळ चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, खोबरे चटणीसह दहा प्रकारच्या वेगवेगळ्या चटणी तयार केले जातात. चित्रा मसाल्याने धाराशिव जिल्ह्यातील बाजारपेठे बरोबरच लातूर आणि पुणे जिल्ह्यात बाजारपेठेत खूप खुप वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. व्यापारी बांधवांकडून चांगली मागणी सुद्धा होऊ लागली असल्यचे, मागणी वाढत असल्याचे सत्यमेव जयते अपंग महिला बचत गटाच्या प्रमुख चित्रा नर्सिंग शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
