
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आष्टी(श)(वर्धा): प्रतिनिधी : नजीकच्या धाडी येथे तात्काळ १ लाख रुपये कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी बचत गटाच्या प्रत्येकी महिलांकडून ४ हजार ३५० रुपये वसूल करत कानात कुंडल असलेला भामटा माझे नाव राकेश पाटील असून सोबत असलेल्या एका व्यक्तीची ओळख बँकेचे डी. एम.आहे असे सांगत होता अश्या दोन भामट्यांनी फसवणूक केल्याची घटना धाडी गावात उघडकीस आली याबाबत आष्टी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले की,वरूड(जि. अमरावती) येथील फाईन केअर बँकेचे नाव सांगत आम्ही अधिकृत प्रतिनिधी असून बचत गटाच्या महिलांना दुसऱ्याच दिवशी १ लाख रुपये कर्ज मंजूर करून कर्जदाराच्या खात्यावर जमा करतो असे आमिष देत प्रत्येकी ३ पासपोर्ट, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्ससह विविध कागदपत्रे २० एक अर्जदाराकडून नगदी ४ हजार ३५० रुपये घेतले शिवाय दुसऱ्या दिवशी महिलांना बँकेत येण्याचा सल्ला भामट्यांनी महिलांना दिला असता सांगितलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील फाईन केअर नामक बँकेत बचत गटाच्या महिला गेल्या असता उपस्थित बँक प्रतिनिधीना महिलांनी वर्णन केल्याप्रमाणे राकेश पाटील + १ असा कोणताही बँकेचा प्रतिनिधी नाही त्यामुळे बचत गटाच्या महिलामध्ये एकच खळबळ माजली आहे जवळपास एकूण फसवणूक रक्कम २लाखाच्या घरात असल्याचे बोलल्या जाते सोबतच नजीकच्या साहूर, सत्तारपूर, माणिकवाडा,तर वरूड तालुक्यातील रोशनखेडा,पेठ मांगरुळी येथील महिलांना सदर भामट्यांनी फसवल्याची चर्चेला उधाण आले आहे सदर भामट्यांनी बचत गटाच्या महिलांना दिलेला मो. ९९२३६४३९०४ सध्या बंद येत आहे तर जे भामटे महिलांना भेटण्याकरता आले त्या दुचाकीचा क्र एम.एच.३६ एम. ५६३५ असून पुढील तपास आष्टी पोलीस स्टेशन करीत आहे