
दैनिक चालु वार्ता आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): महाराष्ट्रभर १८ लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी बेमुदत मुदत संप पुकारला आहे त्या अनुषंगाने तहसील कार्यालयात तालुक्यातील कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे त्यात राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर संघटना सहभागी झाल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीला महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा काँग्रेस पक्षाचे माजी आ. अमर काळे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांच्या मंडपाला भेट घेऊन चर्चा करीत जाहीर पाठिंबा दर्शविला आहे यावेळी नगराध्यक्ष अनिल धोत्रे, मुमताज अहेमद, सोनू माणिकपुरे व काँग्रेस कार्यकर्ते होते