
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करत राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्हाचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी ‘गाव तेथे स्मार्ट शाळा” शाळा तिथे डिजिटल बोर्ड”या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळांना तसेच हायस्कूल नवसंजीवनी देणाचा अभिनव उपक्रम आपल्या मतदारसंघात सुरू केला आहे. शिक्षण, रस्ते, पाणी, आरोग्य तसेच सर्व सामाजिक प्रश्नांसाठी सदैव कार्यतत्पर असणारे कर्तव्यदक्ष विकास रत्न आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब भू म – परंडा – वाशी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आधुनिक पावलं उचलली आहेत. काळानुरूप बदलत्या शिक्षणाची आव्हानं व गरज लक्षात घेऊन गाव तेथे स्मार्ट शाळा तिथे डिजिटल बोर्ड या उपक्रमाला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील शाळांना डिजिटल बोर्ड पोहोचण्यासाठी युवा सेना भुम शहर युवक प्रमुख प्रभाकर शेंडगे, सचिन सूर्यवंशी, मुकेश भगत, राजा कोळी, महेश वाघमारे,महेश गिराम, महेश कोकणे, राहुल आडमुठे, भरत सुरवसे समाधान शिंदे, महेश वाघमारे, मयूर गिरी,अविनाश अनभुले व अक्षय गरड यांनी खूप महत्वाचे व मोलाचे काम केले.यावेळी प्रा.डॉ. रिजवान शेख यांनी सर्वांचे कौतुक केलं