
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:विकासात्मक दृष्टिकोन ठेवून एखाद्या राज्याचा किंवा आपली सत्ता प्रस्थापित असलेला राज्यात विकास करून दाखवावे असा दृष्टिकोन असणारा नेता म्हणजे तेलंगणा राज्याचे
मुख्यमंत्री के सी आर.
तेलंगणा राष्ट्र समितीचे राष्ट्रीय पक्ष व्हावे म्हणून पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले. भारत राष्ट्र समिती राष्ट्र राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर संपूर्ण भारतात तेलंगणाच्या धर्तीवर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून संपूर्ण भारतात तशाच प्रकारे विकास करावा हा मानस प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर करीत आहेत. त्यांनी करत असलेला प्रयत्न हायशस्वी होईल की नाही हा येणारा काळच ठरवेल. भारत स्वातंत्र्यानंतर भारतात एक परंपरा चालत आलेली आहे एखादा नवा पक्ष एखाद्या राज्यात जर लॉन्च होत असेल तर त्यावेळी उत्साही, चिरतरुण चेहरे, युवक आणि तसेच अनेक पक्षातले पदाधिकारी, कार्यकर्ते त्या नवीन पक्षात येऊ इच्छितात. त्याचप्रमाणे नांदेड येथे झालेल्या भारत राष्ट्र समितीच्या जाहीर सभेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा जाहीर प्रवेश झाला आहे असे असले तरी त्यासाठी जाहीर प्रवेश केलेले पदाधिकारी आणि कार्यकर्तेहे तिथेच टिकून चांगल्या प्रकारे कार्य केल्यास नक्कीच येणाऱ्या काळात भारत राष्ट्र समितीचे पक्ष वाढीसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे मदत होईल. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसिआर यांचा विकास करण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत काहीतरी शिकण्यासारखे आहे. गत पाच वर्षापासून मी तेलंगणा राज्यात वास्तव्यास आहे मी गेल्या पाच वर्षापासून ते तेलंगणा राज्यात होत असलेला विकास आणि त्यांनी दिलेला शब्द हा कितपत पाळतात हे मी बघतच आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनीजे जे जाहीर सभेत जनतेस सांगितले होते ते ते दिलेले आश्वासनाची पूर्तता त्यांनी करत आलेले आहेत आणि केलेले सुद्धा आहेत. त्यांनी जाहीर सभेत म्हटले होते की, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करीत आहेत ही गोष्ट खरी आहे. जेव्हा महाराष्ट्रात एका शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस त्याला शासनाकडून जी मदत भेटते ते तेलंगणा राज्याच्या मदतीपेक्षा खूप तुटपुंजी आहे. तेही शासनातर्फे दिली जाणारी मदत हे वेळेवर भेटत नाही, त्यासाठी त्यांच्या
घरातील व्यक्तींना वन वन फिरावे लागते. ते जर तेलंगणाराज्यात पाहिले गेले तर एखादा शेतकऱ्याचा निधन झाल्यास किंवा आत्महत्या केल्यास शासनाकडून रयतू बंधू योजना या नावाखाली पाच लाख रुपये आठ ते पंधरा दिवसाच्या आत त्याच्या घरपोच जाते. तेलंगणा राज्यात त्यांनी जे जे योजना राबवले आहेत ते काटेकोरपणे त्याचे पालन केले जाते. शासनाकडूनही आणि शासकीय कर्मचाऱ्याकडूनही. त्यांच्या योजनेत अंमलबजावणी करीत असताना कुठलेही शासकीय अधिकारी हलगर्जीपणा करीत नाहीत.
बिहारमधून त्यांनी BRS ला देशात नेण्यास सुरुवात केली.आज नांदेडमधून त्यांनी महाराष्ट्रात एंट्री केली. त्यामुळं
राज्यातील राजकारणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी देशपातळीवर पक्ष नेण्याचे आवाहन केलं. आंध्र प्रदेशातून वेगळ्या झालेल्या तेलंगणा राज्यात मागील नऊ वर्षांपासून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाची सत्ता आहे. त्यांच्या सत्ताकाळात तेलंगणात आरोग्य, शिक्षण, उद्योग, कृषी आदी घटकांसाठी केलेल्या कामाची भुरळ सीमावर्ती भागातील गावांना पडत आहे.त्यामुळे तेलंगणाला लागून असलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील काही गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा दर्शविली. त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, किनवट, भोकर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. परंतु, कायद्यामध्ये तशी तरतुद नाही. मुख्यमंत्री केसीआर यांनी टीआरएसचा विस्तार देशभर करण्याचे नियोजन केले. त्यासाठी तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव भारत राष्ट्र समिती करण्यात आले. या बीआरएस पक्षाच्या माध्यमातून के. सी. आर आता देशभरात आपल्या पक्षाची व्याप्ती वाढविणारआहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून त्यातही नांदेड जिल्ह्यातून
झाले आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के सी आर यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर राहून पीडित आणि गरिबांचे उद्धार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.
2004 मध्ये करीमनगर येथे एक करोड रुपयांची
वृक्षारोपणाची योजना राबवले होते. मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी अनेक घरे बांधून दिलीत. सिद्धी पेठ
विधानसभा क्षेत्रात पुरात नुकसान झाल्यामुळे अनेक नुकसान
बाधित आणि पाण्याची गैरसोय होत असल्यामुळे त्यांनापिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आले होते. त्यांना समाजकारण व राजकारणा सोबतच क्रीडा क्षेत्रातही तेवढीच आवड आहे ते रिकाम्या वेळेत बॅडमिंटनही खेळतात. 1980 पासून त्यांचा राजकीय कारकीर्द हे चालू झाले, संजय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली के चंद्रशेखर राव हे आंध्र प्रदेश युवा काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 32 वर्षापासून अनुभव असलेला हा राजकीय व सामाजिक नेता