
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यात दोन दिवसा पासून सुरु असलेल्या वादळी वारा गारासह अवकाळी पावसाने चांगलाच तडाका दिला यावेळी तालुक्यात काही भागात गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाली. असल्यामुळे तालुक्यात शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास गेला अनेक घरादारांचे तसेच शेतातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, टरबूज आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक उदयसिंह बोराडे यांनी प्रशासनास दिल्या तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्याकडे देखील मंठा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील उदयसिंह बोराडे यांनी पत्राद्वारे केली.