
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे
लोहा बेरळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेले गट नंबर 326 संतुका मारुती वड यांच्या मालकीची जमीन 0.39 आर असून संतुका मारुती वड हे मागील 26 /7 /2019 पासून पीएम किसान योजनेचा लाभ घेत असून त्यांचे अचानक येणारे हप्ते बंद झाले कारण कुठलेही न समजल्यामुळे आजपर्यंत पीएम किसान योजने पासून पात्र असलेला लाभार्थी अ पात्र ठरत आहे व दिनांक5/5 /2020 पासून येणारे हप्ते बंद झाले आहेत संतुका मारुती वड यांनी 2 वेळा केवायसी पण केली आधार अपडेट केले बँक खात्याशी आधार लिंक पण केले तरी पण हप्ते येण्याचा पत्ता नाही संतुका मारुती वड त्यांनी तलाठी साहेब यांच्याकडे संपर्क साधला तलाठी साहेबांनी कुठलेही उत्तर कन्फाम न देता येतील हप्ते पात्र यादी मध्ये नाव आहे असे सांगून व आमच्याकडे डाटा राहणार नाही कृषी विभागाकडे जाणार आहे असे पण सांगितले नंतर त्यांनी तहसिल कार्यालय लोहा येथे अर्ज केला व अर्ज करून पण कुठलाही फायदा झाला नाही शेतकरी पात्र आहे की अपात्र त्यांना काही सांगण्यात पण आलेले नाही संतुका मारुती वड यांनी दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिनिधींनी माहिती काढली तेव्हा समजलं की त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र दाखल करून हप्ते बंद झाले आहेत व जिवंत माणसाचे मृत्यू प्रमाणपत्र दाखल करून पुढील येणाऱ्या हप्ते बंद केले आहेत असे कळतात संतुका मारुती वड यांच्या पायाखालची माती सरकली मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय लोहा यांनी माझी चौकशी करून कोणी माझे हप्ते बंद केले कुठल्या आधारे केले याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी संतुका मारुती वड यांनी दैनिक चलु वर्तासी बोलताना दिली व माझे पेंडिंग पडलेले हप्ते ताबडतोब माझ्या खात्यात वर्ग करावे असे पण त्यांनी सांगितले अशी चुकीची माहिती दाखल करून शेतकऱ्यांचे हप्ते बंद करणे हा कुठला न्याय आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि एकीकडे शासनाकडून मिळणाऱ्या योजनेपासून शेतकऱ्यांना दूर ठेवण्यात येत आहे