
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम तालुका काँग्रेस कमिटच्या वतीने लोकनेते मा.बसवराज पाटील यांचा पिंपळाच्या पानावर कोरलेले त्यांचे स्वतःचे चित्र देऊन सत्कार पदाधिकारी यांनी केला
भू म:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री मा. बसवराज पाटील यांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगने भुम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा पिंपळाच्या पानावर कोरलेले त्यांचे स्वतःचे चित्र देऊन सत्कर केला व पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू,भूम तालुका कांग्रेस कार्याध्यक्ष ऍड सिराज मोगल,परांडा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद, भूम तालुका अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष शेरखान पठाण, कळंब तालुक्याचे काँग्रेसचे युवा नेते अभिषेक गुजर ईटकुरकर, चैतन्य मनगिरे हे उपस्थित होते. त्यांच्या या निवडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील युवक कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे सर्वत्र पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.