
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
वाघोली, दि 19 नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दैनिक चालू वार्ताचे वाघोली प्रतिनिधी श्री स्वरूप तुकाराम गिरमकर यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ शिरूर तालुका प्रचार प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर, कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी नुकतेच निवडीचे त्यांना पत्र दिले.
स्वरूप गिरमकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की माहिती अधिकार फेडरेशनचे संपूर्ण नियम व अटी, आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करीन, व या पदावर जबाबदारीने काम करीन, या पदाचा कुठलाही गैरवापर करणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळेस सांगितले. या निवडीनंतर शिरूर तालुक्यातील मित्र परिवाराकडून यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.