
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजिनगर उपसंपादक -मोहन आखाडे
लव्ह जिहाद गो हत्या धर्मातर विरोधी कायदा सपुर्ण राज्यासह देशात लागु करावा हि हिदु जन गर्जना मोर्चात प्रमुख मागणी
छत्रपती संभाजी
नगरमध्ये सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्या वतीने नामांतराच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील क्रांती चौक ते औरंगपुरा या मार्गादरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ अनेक पक्षाच्या आणि संघटनांच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे.
हिंदू जनगर्जना मोर्चाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. क्रांती चौकात हिंदू जनगर्जना मोर्चातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
गेल्या तीन आठवड्यापांसून छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने होत आहेत. नामांतराची घोषणा झाली त्यावेळी सर्वप्रथम एमआयएमने याला विरोध करत आंदोलन सुरू केले. त्यानंतर काही मुस्लीम संघटनांनीही नामांतराला विरोध करत आंदोलन सुरु केले होते.
आता नामांतराच्या समर्थनार्थ आंदोलनांना सुरुवात झाली आहे. परवा मनसेकडून समर्थनार्थ मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज शहरातील आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून जनगर्जना मोर्चा काढण्यात आला आहे.
या जनगर्जना मोर्चात 50 हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोर्चा काढण्यात आला आहेत.