
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
सदैव शेतकऱ्यांचे हित जोपासतो म्हणणारे मा.आ. शंकरआण्णा धोंडगे यांना आगामी लोकसभा निवडणुक लढवायची इच्छा असून त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देत बि आर एस पक्षात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे.सा.न्याय.विभाग लोहा तालुकाध्यक्ष मारोती कांबळे यांनी मा.आ. शंकरआण्णा धोंडगे यांच्यावर आरोप केला आहे.
शंकरआण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्याने लोहा- कंधार मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाला काही ही फरक पडणार नाही वा राष्ट्रवादी पक्ष बंद पडणार नसून आम्ही राष्ट्रवादी पक्षातील नेष्टावांत कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामा लागू व लोहा-कंधार मतदार संघामध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकत वाढवू असे प्रतिनिधीशी बोलतांना मारोती कांबळे म्हणाले. तसेच माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी फार काही केले नाही. उलट त्यांच्या स्वार्थीपणामुळे ह्या मतदार संघामध्ये पक्षाचा प्रवास थांबला होता. त्यांनी पक्षातील कार्यकत्यांना कधी ही न्याय दिला नाही. प्रत्येक्षात त्यांनी कार्यकत्यांमध्ये भेदभाव केला. त्यामुळे त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती.
त्यांनी राष्ट्रवादी पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर काहीच फरक पडणार नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येतील, असा विश्वास ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे.सा.न्याय.विभाग लोहा तालुकाध्यक्ष मारोती कांबळे यांनी व्यक्त केला.