दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-देशातील पहिली शेतकरी आत्महत्या १९ मार्च १९८६ रोजी झाली आणि त्याची नोंद सुद्धा शासन दरबारी आहे.यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हान गावातील स्व.साहेबराव करपे यांनी कुटुंबासह वर्धा जिल्ह्यातील दत्तपुर कुष्ठधामात आत्महत्या केली.आत्महत्याप्रती सहवेदना व्यक्त करत आणि शेतकरी विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांनी एक दिवसीय उपोषण केले.अमरावती मधील शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ १९ मार्च रविवार रोजी स्व.साहेबराव करपे यांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.किसानपुत्र आंदोलनाचे प्रकाश साबळे व नितीन पवित्रकार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ६०० शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला.
याप्रसंगी शेतकरी नेते विजय विल्हेकर,हरिभाऊ मोहोड,संजय देशमुख,सौ.पौर्णिमा सवाई,धनंजय काकडे,प्राध्यापक दिलीप काळे,संजय पांडव,महेश देशमुख,राहुल तायडे,निलेश उभाड,मोहन पुंड,आदी मान्यवरांनी विशेष सहभाग नोंदविला.
