
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील क्रीडा कौशल्यवाढून त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी, खेळाडूंना सरकारी व निमसरकारी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन इंजि. माधव चव्हान यांनी केले. मंठा तालुक्यातील माळेगाव येथे इंजि माधव गुलाबराव चव्हाण आयोजित हॉलीबॉल स्पर्धेला दिनांक 18 मार्च पासुन सुरुवात झाली होती या तीन दिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातुन 22 संघाने सहभाग नोंदवाला होता.या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेतील विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी दुबई, टांझानिया, आफ्रिका येथे मराठवाड्यासह देशाचे नाव रोशन केले असे फुलचंद वाघ यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या अमीर सोलापूर संघाने छत्रपती संभाजीनगरच्या फॅन्ड्री संघाचा पराभव करत या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले तर .द्वितीय पारितोषिक छत्रपती संभाजी नगर फॅन्ड्री संघ.त्रितिय पारितोषिक माजलगाव, चतुर्थ पारितोषिक तिरंगा किर्ला या संघाने पटकावलं आंतरराष्ट्रीय खेळाडू फुलचंद वाघ यांचा गावकऱ्यांचा वतीने भव्य सत्कार करण्यात आला नंतर इंजि. माधव गुलाबराव चव्हाण यांच्या हस्ते विजय संघास पारितोषिक देऊन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सेवकराम श्रीराम राठोड(भा.ज.पा युवा मोर्चा मंठा तालुका उपाध्यक्ष ) रघुनाथ राठोड, विनायक गोबरा राठोड, वैजिनाथ जाधव, या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नमो गणेश मित्र मंडळ माळेगाव- राजूदास राठोड, विकास जाधव, राजू चव्हाण, सचिन राठोड, कुलदीप उर्फ पप्पू राठोड, करण राठोड, निलेश राठोड, संजय चव्हाण, टायगर चव्हाण, त्रिभुवन चव्हाण, राहुल चव्हाण, पंकज चव्हाण, गजानन गडधे, आकाश चव्हाण, आकाश राठोड, बाळू राठोड, अजय राठोड, सतीश पवार, प्रवीण पाठोड राज राठोड, किरण राठोड , संतोष राठोड, विजय राठोड (बंजारा स्टार तथा कॉरिओग्राफर ) बंडू पवार, अमोल पवार, जितेश पवार यांनी परिश्रम घेतले. अविनाश राठोड, रोहित राठोड,समाधान राठोड, स्वप्नील राठोड, रवींद्र राठोड, विठ्ठल राठोड, यांनी पंच काम पहिले..
स्पर्धेतील खेळाडूस अन्नदान गुलाबराव आनंदा चव्हाण व पंढरीनाथ बाबा चव्हाण यांनी केले या प्रसंगी मोठ्या संख्येने गावातील व पंचक्रोशीतील हॉलिबॉलप्रेमीसह नागरिक उपस्थित होते.