
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): तालुक्यातील धाडी येथील म्हातारी रुखमा धनराज सरोदे (७५) बाहेरगावी जाण्यासाठी बसस्टॉप वर आली असता बस अपघात झाला त्यात म्हातारी रुखमा सरोदे हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली लागलीच उपस्थित कार्यकर्ता अनिकेत कांबळे(२५) व मुलगा प्रकाश सरोदे(६२) याने म्हातारीला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते उपचारांत म्हातारीला रेफर केल्याची माहिती आहे सदर एसटी बस आर्वी आगाराची असून आर्वी ते वरुड या मार्गावर धावणारी होती तर एसटी बस क्र.एम.एच.४० एन.८७७६ असून बस चालक बादल आखरे याने घटनास्थळावरून पळ काढून आष्टी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली यावेळी असंख्य प्रत्यक्षदर्शी अपघात पाहण्यात दंग होते मात्र म्हातारीला मदत करण्यासाठी कुणीही धजावत नव्हते असे अपघात दर्शी सांगतात सदर अपघात संदर्भात आष्टी पोलीस स्टेशनला फोन केला असता दूरध्वनी नॉट रिचेबल होता त्यामुळे अपघाताची कायदेशीर नोंद कळू शकली नाही
प्रतिक्रिया
गंभीर जखमी रुखमाबाई सरोदे हिला एस.टी. महामंडळाने आर्थिक मदत द्यावी तर धाडी बस स्टॉपवर पश्चिम बाजूस प्रवासी निवारा करावा
सरपंच
दिलीप भाकरे ग्रा.पं.धाडी