
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): राज्यातील कर्मचारी वयाच्या ५८ ते ६० पर्यंत गलेलठ्ठ पगार घेऊन निवृत्तीनंतर आर्थिक गणित जुळवण्यात अपयशी ठरत असेल तर २०० रुपये रोजंदारी कमावणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, दैनंदिन मजूर यांचे वर्तमान व वयाच्या ६० नंतर चे हाल लक्षात घेवून त्यांनाही २५ हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची मागणी साहूर येथील लोकहित दक्ष समिती अध्यक्ष शरद वरकड साहूरकर यांच्या नेतृत्वात तर नगरसेवक रामकृष्ण सुरजुसे, आनंद निंबेकर, योगेंद्र सोनटक्के यांच्या सहमतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे याबाबत असे की, राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी बेमुदत संप पुकारला होता त्या पेन्शनसंपाला तीव्र विरोध म्हणून लोकहित दक्ष समितीच्या वतीने आष्टी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांनी मताचे राजकारण न करता राष्ट्रहितासाठी पूरक कार्य करावे यासोबतच जनतेची अडवणूक होणार नाही यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना अल्प मानधनावर काम करण्याची संधी द्यावी असेही निवेदनात नमूद केले आहे यावेळी निवेदनकर्त्यांनी जय जवान जय किसानचा नारा देत तहसील परिसर दणाणून सोडला होता यावेळी सुरेश टरके, पांडुरंग हिवरे, शंकरराव पांडे, छगन ढोरे, विजय गावंडे, प्रफुल मुंदाने, मंगेश चौधरी, विलास दंडाळे, बंटी खरवडे, नरेश घोटकर, रोशन गावंडे, योगेश सोनटक्के, पंढरी खाडे,शेख असिफ,रामाजी बोटरे, सोहेल खान, निलेश चोपडे,विवेक दारोकार आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत