
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार –
विश्वभुषण भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या सार्वजनीक जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने येथील शासकिय विश्रामगृह येथे दि. १९ मार्च २०२३ रोजी विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळाची नुतन कार्यकारिणीच्या निवडी साठी बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष साहेबराव मोरे यांच्या सह भिमराव दुधारे , सिद्धार्थ जाधव , जयभीम पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती
यावेळी सर्वानुमते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक जयंती मंडळ नुतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सम्राट हिरे यांची तर उपाध्यक्ष आनंद ढोले,प्रबुद्धभारत (मुन्ना)कावळे,सचिवपदी दलीत डोंगंरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून यांच्यासह सर्व कार्यकारिणीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळा भोकर येथे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प भोकर येथील जयंती मंडळाने केला आहे उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे कोषाध्यक्ष प्रशांत हनमते , सहकोषाध्यक्ष कपील कांबळे ,संघटक अविनाश गायकवाड, सहसचिव संतोष डोगंरे ,सहसंघटक संघदिप वारघडे, कार्याध्यक्ष मनोज शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सर्व पत्रकार ,सल्लागार एल.ए.हिरे, साहेबराव मोरे,भिमराव दुधारे, ॲड. सिद्धार्थ कदम , सुरेश कावळे ,गौतम कसबे,जयभीम पाटील ,विक्रम क्षिरसागर, सुनिल कांबळे ,देवा हटकर ,दिलीप राव ,मधुकर गोवंदे, भिमराव भंडारे, संदीप लोमटे ,माणिक जाधव, दिगांबर कांबळे, राहुल सोनकांबळे ,श्रीधर घुले ,सुभाष तेले ,शिवाजी गायकवाड , ॲड आर.के.कदम ,भिमशाहीर बाबुराव गाडेकर, राजु दांडगे ,संदीप गायकवाड , ॲड अंबादास काळे आदिची निवड करण्यात आली आहे.