
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे इसाद येथे लोकसहभागातून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याचे काम मोठ्या जोमात सुरू आहे.
इसाद येथील मासोळी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीच्या विकासाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकसहभागातून करण्यात आला.
बुधवार दिनांक 22मार्च2023 रोजी इसाद या गावातील दानशूर व्यक्तींनी
आपापल्या पूर्वजांच्या आठवणी निमित्त एक-एक सिमेंटचा बेंच स्मशानभूमीसाठी अर्पण केला.
या 30 बेंचचा लोकार्पण सोहळा विधिवत पूजा व नारळ फोडून संपन्न झाला.
आगामी काळात या स्मशानभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी झाडे लावणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छता ठेवणे, लाईटची व्यवस्थासह आदी सुविधा उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
राजकारण, समाजकारण, व्यापारासह गंगाखेड तालुक्यात इसाद या गावाचा वेगळाच दबदबा आहे.
तसेच गावच्या स्मशानभूमीच्या विकासातही इसाद या गावातील नागरिक आपला दबदबा कायम ठेवतील असा विश्वास आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इसाद येथे कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदासराव धोंडीबा भोसले हे होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून गंगाखेड शहरातील गंगोत्री आश्रम चे हभप.निवृत्तीनाथ महाराज इसादकर , पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाचे संकल्पक गोविंदराव दुधाटे, आम आदमी पक्षाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, सुनेगाव स्मशानभूमीच्या विकासासाठी कायम धडपड करणारे कृष्णा सुर्यवंशी, शैक्षणिक क्षेत्रात गंगाखेड तालुक्यात वेगळी ओळख असलेल्या ‘स्वर’ फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे, रंगनाथ दुधाटे,
रामेश्वर सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
इसाद गावच्या सर्वांगीण विकासासाठी कायम धडपड करणारे रामेश्वर(आर.डी)भोसले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी नरहरीराव भोसले, किशनराव भोसले, रावसाहेब भोसले, विश्वनाथराव भोसले, गोपीनाथराव भोसले, आबासाहेब भोसले, सुधाकरराव भोसले, रोहिदासराव भोसले, पांडुरंग भोसले सर, अनिलराव भोसले, आर.के.भोसले, शिवाजीराव भोसले, दत्तराव भोसले, बाळासाहेब भोसले, अर्जुनराव भोसले, माधवराव भोसले, दिगंबरराव भोसले, भाऊजी पांचाळ, बाबासाहेब देवकते, विष्णुदास वाळके, प्रकाश पवार, माऊली भोसले, खंडेराव भोसले, बाबासाहेब भोसले, उत्तम भोसले, गोविंद भोसले, माऊली भोसले, सोपान भोसले, बालासाहेब भोसले, विवेकानंद भोसले, गोविंद शा.भोसले, सुदर्शन भोसले, विकास भोसले, गोविंद वा.भोसले, दादासाहेब भोसले, नानासाहेब भोसले, अतुल भोसले, चंद्रकांत भोसले, कल्याण भोसले, वाघा भोसले, प्रशांत भोसले, मारोती आवाड यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.