
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम : शहरातील प्राईड इंग्लिश स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित विद्यार्थ्याच्या विविध गुणदर्शनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन येथील प्रसिध्द डॉ. प्रदीप मोरे यांच्या हस्ते व अलीम शेख सर, शाळेचे संचालक ऍड. सिराज मोगल, अमर सुपेकर व फैजान काझी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मान्यवराच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अलीम शेख म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम होने अत्यंत आवश्यक आहे. यावेळी डॉ. प्रदीप मोरे यांनीही प्राईड स्कूलच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेंच यावेळी पालक सौ. अमृता टकले व सौ. उषा गटकळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थानी, हिंदी,मराठी चित्रपट व लोकगीतावर बहारदार नृत्य सादर केली. शेतकरी, कोळी गीते मुलांनी सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या विदयार्थ्यांना इम्रान शेख यांनी नृत्य चे धडे दिले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्याणी असलकर, मेघा सुपेकर, सरस्वती कुलकर्णी,आशा म्हेत्रे, बोत्रे बाई यांच्यासह स्वप्नील सुपेकर, अतुल पुणेकर, डिगा पुणेकर यांनी परिश्रम केले.