
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-
भोकर : शहरात जुगार मटका हा एका ठिकाणी एक इसम घेत असल्याची खबर ही पोलिसांना मिळाली त्यावरून पोलीसांनी त्याचा तपास करीत असताना एकास ताब्यात घेतले आहे.
शहरासह तालुक्यात जुगार, मटका, दारू, गुटखा, अश्या धंदयानी सर्वसामान्य व गोरगरीब तसेच अल्पवयीन मुलाना व्यसनाधीन केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यातच शहरात अवैध धंदे चालू असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यावरून भोकर चे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार संजय पांढरे व पोलीस अमलदार सोनाजी कानगूले यांना एका ठिकाणी मटका खेळत व खेळवीत असल्याची त्यांना गुप्त माहिती मिळाल्या नुसार गुप्त माहितीच्या आधारे व पो. नि. यांच्या मार्गदर्शनानुसार दि. १६-०३-२०२३ रोजी सायंकाळी अंदाजे ६ वाजताच्या दरम्यान भोकर येथील बस स्थानक परिसरातून एका आरोपीस नामे शेख बासिद शेख अहेमद रा.बिलाल नगर भोकर यास ताब्यात घेऊन विचारपूस करून झडती घेतली असता तो कल्याण क्लोज नावाचा जुगार मटका खेळत व खेळवीत असल्याची खात्री झाल्यावर रोख रक्कम १६५० रुपये त्याच्या कडून जप्त करण्यात आली आहे परंतु दुसरा आरोपी नामे शेख जब्बार शेख अकबर रा.रशीद टेकडी भोकर हा मिळाला नाही पोलीस अमलदार संजय पांढरे यांच्या फिर्यादी वरून भोकर पोलिसात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.