
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा):आज आष्टी येथे सायंकाळच्या ४:३० वाजता दरम्यान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर झालेल्या दुचाकी अपघातात दोघे ठार झाले असल्याची माहिती दै.चालू वार्ताच्या हाती लागली आहे प्राप्त माहितीनुसार पोरगव्हाण(पंचाळा) येथील रहिवासी मंगेश सुरेशराव बोरिवार (३५) हा क्रेन मशीन आणण्यासाठी जात असताना ठार झाला तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या नजीकच्या ल.आर्वी येथील २५ वर्षीय तरुण सदानंद केशव आरण आष्टी येथे साक्षगंधाचे पाहुणे पोहचून लहान आर्वी येथे येत असताना आष्टी येथील आयटीआय प्रशिक्षण संस्थेसमोर समोरासमोर धडक बसून गंभीर जखमी झाला लागलीच काही नागरिकांनी सदानंद आरण याला दवाखान्यात नेले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले मृतक सदानंद आरण(२५) आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता तर पोरगव्हाण येथील मंगेश बोरिवार हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे याबाबतीत आष्टी पोलीस स्टेशनला मधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस स्टेशन मधील दूरध्वनी नॉट रिचेबल येत होता त्यामुळे अपघाताच्या बाबतीत कायदेशीर माहिती मिळू शकली नाही.