
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (चिखलदरा) :– परतवाडा ते धारणी रोडवर पिली नजिक शासकीय वार आणि खाजगी बस अमोरासमोर भिडल्याने मोठा अपघात झाला.परतवाडा कडे जाणारी श्रीराम ट्रॅव्हल्स (खाजगी बस) एमएच २७ ए ९६३९ परतवाडा कडून धारणी कडे जाणारी वनविभागाचे शासकीय वाहन बोलेरो एमएच ३१ एफसी २४९४ जात असताना अचानक पिली नजिक श्रीराम ट्रॅव्हल्स (खाजगी बस) ने शासकीय वाहन वनविभागाच्या गाडीला जोरात धडक दिल्याने शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश युनाते हे जखमी झाले.त्यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडोह येथे दाखल करण्यात आले होते.परंतु त्यानंतर परतवाडा येथे हलविण्यात आले.तर श्रीराम ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.विशेष म्हणजे ज्याठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी पूल असल्यामुळे त्यापैकी कुठलीही गाडी पुलाखाली कोसळली नाही.जर वाहन पुलाखाली कोसळले असते तर मोठी घटना घडली असती मात्र; थोडक्यात सर्व प्रवासी बचावले हे विशेष.तर दुसरीकडे शासकीय वाहनाचे वाहन चालक मिठाराम मुन्सी कोल्हे वय ४३ राहणार कांडली परतवाडा यांनी चिखलदरा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलीसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बोलताना सांगितले.पोलीसांनी आयपीसी कलम २७९,३३७,४२७ अन्वये श्रीराम बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.