
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / वडेपुरी :- जिल्हा परिषद हायस्कुल वडेपुरी ता.लोहा येथील इयत्ता आठवीत शिकत असलेली विद्यार्थीनी कु. समिक्षा सुदाम राऊत हिची जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करून इस्त्रो सहलीसाठी निवड करण्यात आली.
पाचवी ते आठवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्र ,तुंबा स्पेस म्युझियम केरळ , तसेच विश्वेश्वरय्या टेक्निकल म्युझियम बेंगलूरू येथील प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी व कार्याची माहिती मिळविण्यासाठी,वैज्ञानिक संशोधन वृत्तीला वाव मिळेल या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर/ घुगे तसेच जिल्हा परिषदेच्या ( प्रा.शिक्षणाधिकारी ) सविता बिरगे यांनी इस्त्रो सहल परीक्षेचा आराखडा तयार करून प्रथम बिटस्तर ,दुसरी परीक्षा तालुका स्तरावर अंतिम निवड परीक्षा जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांचे स्पर्धा घेऊन त्यापैकी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. यातून निवड केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जि .प.हा .वडेपुरी येथील इयत्ता आठवी वर्गात शिकत असलेली कु.समीक्षा सुदाम राऊत हिची निवड झाली आहे . हीच्या घरची हालाखीची परिस्थिती ,आई वडील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्माला येऊन स्वतःच्या जिद्दीवर ह्या मुलीनी उत्तुंग भरारी घेतली आहे. यातून आकाशगंगा अंतराळाबद्दल कुतुहल निर्माण झाला आहे यावर काहीजण अभ्यास संशोधन देखील करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते परंतु योग्य मार्गदर्शन नसल्याने ते मागे पडतात पण योग्य दिशा दिल्याने विद्यार्थी जीवनातूनच शास्त्रज्ञ तयार होतील हे येणारा काळ सांगेल ! श्री नुकलवार गंगाधर ( शिक्षक)श्री भारती अवधूत (शिक्षक ) शाळेचे मुख्याध्यापक श्री पांचाळ यांनी अथक परिश्रमातून विद्यार्थी घडवले
यामुळे गावकरी यांच्या वतिने व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे.