
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे बारूळ ता.कंधार येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी येथील जागृत देवस्थान महादेवा ची भव्य यात्रा १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान मानार फेस्टिवल तसेच प्रबोधनकार श्री.सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन , तसेच आरोग्य तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात प्रसिध्द असलेले बारूळ येथील जागृत देवस्थान श्री महादेव मंदिर असून येथे दरवर्षी बारशी निमित्त यात्रा भरत असते व बाहेरगावाहून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तसेच यात्रे निमित्त येथे अनेक मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी अशाच सदाबहार कार्यक्रमांची मेजवानी येथे यात्रेकरुंसाठी ठेवण्यात आली असून सदरील यात्रेला दि. १ एप्रिल रोज शनिवार पासून सुरुवात होत असून , दि १ एप्रिल शनिवारी महादेव काठीची स्थापना व काठीचे लग्न, दि.२ रविवारी रात्री ८ वा. सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांचा विनोदातून प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३ एप्रिल सोमवारी रात्री ८ वाजता महेंद्र बनसोडे प्रस्तुत लावण्य साम्राज्ञी सिनेस्तारका शिफा पुणेकर यांचा “कैरी मी पाडाची” लावण्यांचा सदाबहार कार्यक्रम, दि .४ एप्रिल रोज मंगळवार ह्या दिवशी सिनेस्टार मृणाल कुलकर्णी प्रस्तुत भाग्यश्री प्रोडक्शन सोलापूर यांचा “लावन्यखणी” लावणीचा कार्यक्रम,तर दि ५ एप्रिल बुधवारी कुस्त्यांची दंगल व दि. १ ते ५ एप्रिल पर्यंत डॉ. योगेश दुलेवाड वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र बारूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करणार असून गरजुनी सदरील शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महादेव यात्रा उत्सव समिती बारुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच टेनिस बॉल क्रिकेट चे खुले सामने आयोजित करण्यात आले असून सदरील कार्यक्रमांचा यात्रे करू,भाविक भक्त व व्यापाऱ्यांनी लाभ घावा व कार्यक्रमांची आणि यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन महादेव मंदिर संस्थान व ग्रामास्थामार्फत करण्यात आले आहे.