
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड मुखेड येथील चाणक्य इंग्लिश स्कूल येथील सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न.
शहरातील असलेल्या शिवाजीनगर भागातील चाणक्य इंग्लिश स्कूल मध्ये 26 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता वार्षिक स्नेहसंमेलन चा भारदार कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीय अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड गजानन शिंदे हे होते
या कार्यक्रमाचे आयोजक चाणक्य इंग्लिश स्कूलचे संचालक अॅड गजानन हिवराळे, व सौ अनुराधा हिवराळे यांनी केले असून या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.संजय वावदाने, व परफेक्ट इंग्लिश स्कूलचे संचालक केंद्रे सर, अॅड जाधव मॅडम हे उपस्थित होते. वकील पत्रकार विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते महिला शिक्षक शिक्षिका व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
चाणक्य इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणावर खुश होऊन पालकांनी टाळ्यांच्या माध्यमातून खूप मोठा प्रतिसाद दिला आहे.