
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- येथील विठ्ठल मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका कार्यक्रमात शांतता व सुव्यवस्थेसाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कामकाजात अळथडा निर्माण करून शिवीगाळ करणाऱ्या दोघांना पोलीसांनी सोमवारी (ता.२७) अटक केली असून त्यांच्यावर महिला पोलीस कर्मचारी विशाखा प्रवीण कैकाडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी प्रवीण देविदास नेमाडे वय ३६,बळीराम नारायण धर्मे वय ५८ दोघेही राहणार अंजनगाव यांच्यावर भांदवी ३५३,२९४,५०६,३४ कलम अनुसार गुन्हा नोंद करण्यात आली असून मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की रविवारी (ता.२६) येथील विठ्ठल मंदिर परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रमात सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान पोलीस बंदोबस्तावर असलेल्या महिला कर्मचारी विशाखा कैकाडे ह्या आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी प्रवीण नेमाडे व बळीराम धर्मे यांनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली वा त्यांच्या कामात अडथळा व गोंधळ निर्माण केला फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला व आरोपींना अटक केली.सदर प्रकरणात अंजनगाव सुर्जी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनंत हिवराळे तपास करीत आहेत