
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी केंद्र शासनाने रद्द केल्याचा निषेध मंगळवारी सकाळी १० वाजता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत इर्विन चौक येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख,आमदार यशोमतीताई ठाकूर,माजी आ.वीरेंद्र जगताप,आ.बळवंत वानखडे,यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आला आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्यावर एकतर्फी केलेली मोदी सरकारची कारवाई म्हणजे हुकूमशाही राजवट असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला.
यावेळी आंदोलनात माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे,सुधाकरराव भारसाकळे,प्रकाशराव काळबांडे,बाळासाहेब हिंगणीकर,हरिभाऊ मोहोड ,प्रदीप देशमुख,भैय्यासाहेब मेटकर,संजय वानखडे,दयारामजी काळे,संजय लायदे,प्रदीपराव देशमुख,मुकद्दर खा पठाण,संजय बेलोकार,शिवाजीराव बंड,गिरीशराव कराळे,दिलीपराव काळबांडे,श्रीधरराव काळे,नामदेवराव तनपुरे,मनोज गेडाम,हेमंत येवले,कैलासराव आवारे,किशोरराव देशमुख,सतीशराव पारधी,स्वप्निल देशमुख,राजेंद्र गोरले,सहदेवराव बेलकर,अनंतराव साबळे,महेंद्रसिंग गैलवार,श्रीकांत झोडपे,सागर व्यास,बाबुरावजी गावंडे,सुनील गावंडे,राहुल येवले,दीपक सवाई,हरीश मोरे,विदर्भकुमार बोबडे,भूषण कोकाटे,विनोद पवार,नितेश वानखडे,प्रवीण हूड,सुखदेव गोडेकर,अब्दुल नईम,मुकुंदराव देशमुख,सुधीर पाटेकर,प्रमोद दाळू,गजाननराव काळे,अवधूतराव मातकर,अमितराव गावंडे,श्रीकांत बोन्डे,दत्ता कुंभारकर,सिद्धार्थ बोबडे,बिट्टू मंगरुळे,समाधानराव दहातोंडे,निखिल कोकाटे,सपनाताई शिंगणे,प्रशांत देशमुख,विनायकराव ठाकरे,पंकजराव देशमुख,सच्चिदानंदराव बेलसरे,समीर पाटील,राकेश झारखंडे,सोनाजी सावलकर,जहीर भाई,विनोद जगताप,ऋग्वेद सरोदे,एजाज खान,भैय्यासाहेब वानखडे,किशोर किटूकले,विठ्ठलराव सरडे,योगेशराव ईसळ,अमोल चिमोटे,नितीन खलोकार,पंडितराव पंडागळे,जी.एम.खान,सरफराज खान,पवन पाचपोर,भागवतराव खांडे,राजेश काळे,राहुल गाठे,गौरव वैद्य,रमेश बोरा,शैलेश निरगुडे,इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.