
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी अंबड-ज्ञानेश्वर साळुंके
पोचोरा ता. राज्यांत काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे काही ठिकाणी उकाडाही चांगलाच वाढला आहे. मुंबईतही तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रांत जळगांव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. यामध्ये एका शेतमजुरांचा शेतात काम करत असताना उन्हांच्या तीव्र तडाख्यांने मृत्यू झाल्यांची घटना समोर आली. ही घटना पाचोरा तालुक्यांतील वरसाडे-तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण ( वय ३६) असे या मृत शेतमजुरांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीवरुन जळगांव येथील पाचोरा तालुक्यांतील वरसाडे-तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हे सोमवारी शेतात काम करीत असताना त्यांना जास्त उन्हांच्या तीव्रतेमुळे त्यांना चक्कर आल्यांने ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रेमसिंह शेतमजुरीचे काम करुन आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवत होता. प्रेमसिंग यांच्या पश्चांत आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा त्यांचा मोठा परिवार होता. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यांने चव्हाण कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.