
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील खामसवाडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊ साठे चौकात क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील व मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी महात्मा फुले यांच्या जिवण चरीत्रावर हनुमंत पाटुळे यांनी विचार व्यक्त केले.या वेळी भाजपाचे सावता माळी, सतिश वैद्य, सामाजिक कार्यकर्ते भिमराव कांबळे, बाळासाहेब पाटुळे, महादेव पाटुळे, धनराज पाटुळे, संजय पाटुळे, भाऊ शेंडगे, बाबासाहेब पाटुळे, सुमनताई शेळके,भिमशाहिर राजेंद्र कांबळे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.