
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
पर्याय परिवाराकडून क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले जयंती साजरी मंगळवार (दि.11 )रोजी अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. , पर्याय सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले मुच्युअल बेनिफिट ट्रस्ट कळंब च्या वतीने पर्याय कॅम्पस हसेगाव के येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली अनिक चे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. विश्वनाथ अण्णा तोडकर आणि सौ. अनिता ताई तोडकर यांचे हस्ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले यावेळी उपस्थित अनिकचे धाराशिव जिल्हा मोहीम प्रमुख विलास गोडगे, शाखा व्यवस्थापक भिकाजी जाधव, एकल महिला संघटनेच्या प्रमुख सुनंदा खराटे, मुख्य लेखापाल विकास कुदळे, क्षेत्राधिकारी आश्रुबा गायकवाड, वैभव चोंदे, क्लस्टर सहायक स्वाती कवडे, मीरा पवार, सहायक लेखापाल रियाज शेख, कार्यालय सहायक संगीता अंकुश आदी उपस्थित होते.