
दैनिक चालु वार्ता धर्माबाद प्रतिनिधी:- किरण गजभारे
तालुक्यात कधी नव्हे ते विळेगाव ते पिंपळगाव रोडवर कॅनल जवळ दि.10 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6:00 च्या सुमारास मोटारसायकलचा पाठलाग करून गाडी पाडून डोळ्यात मिरची टाकून सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग व नगदी रोख रक्कम 41 हजार असे मिळून तब्बल 11 लाखाच्यावर मुद्देमाल चार अज्ञात चोरांनी पळवून नेल्याची घटना घडली होती. सदरील जबरी चोरीबाबत धर्माबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नुकतेच धर्माबाद पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारलेले शिंदे यांच्यासमोर त्या चार चोरांनी आव्हान निर्माण केले होते, पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तपासाची चक्रे गतिमान करत स्वतः ह्या जबरी चोरीचा तपास करत अवघ्या 24 एका आरोपीस जेरबंद केले आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस स्टेशन धर्माबाद हद्दीत दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आर्या ज्वेलर्स करखेली येथील व्यापारी अजित वसंत माने वय 30 वर्षे राहणार कारेगाव फाटा तालुका धर्माबाद हे नेहमीप्रमाणे सायंकाळी आपली दुकान बंद करून मोटरसायकलने पिंपळगाव मार्गे
कारेगाव फाटा कडे जात असताना मौजे पिंपळगाव येथील कॅनॉल जवळ अनोळखी चार चोरांनी त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करून मोटरसायकल च्या पाठीमागून धडक देऊन डोळ्यात मिरची टाकून त्यांच्या जवळ असलेले सोन्याचे चांदीचे व नगदी रुपयाचे बॅग चाकूचा धाक दाखवून जबरीने चोरून नेले होते, त्या बॅगमध्ये सोन्याचे 86.05 ग्राम ज्यांची किंमत 5 लाख 1हजार 700 रु. चांदीचे 8 किलो वजनाचे दागिने किंमत 5 लाख 60 हजार व नगदी 41 हजार 950 रू. असे मिळून 11 लाख 3 हजार 650रु. चा मुद्देमाल चोरून नेला होता ह्या प्रकरणी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे गुरन 72/2023 कलम 394, 34 भादवि प्रमाणे दाखल करण्यात आले होते, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पथक तयार करून स्वतः पथकासह निमटेक उमरी हा भाग पिंजून काढला, पोलीस निरीक्षक शिंदे यांनी आपले पोलिसी कसब दाखवत कृतिशील कार्यवाही करत गुप्त बातमीदारांकडून माहिती काढत सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी हा गोळेगाव असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पथकासह जाऊन ताब्यात घेतले, आरोपीस पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आहे. त्या आरोपीस ताब्यात घेऊन 24 आत गुन्हा उघडकीस आणून अनोळखी आरोपी निष्पन्न करून आरोपीस जेर बंद केले आहे.
चोरीचा मुद्देमालाबाबत अधिकची चौकशी व इतर साथीदार कोण? ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिंदे व त्यांचे पथक करत आहे.