दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- आज शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ अंजनगाव सुर्जी येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानावांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन स्थानिक विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन करण्याचे योजिले आहे,या करिता लोकसंवाद सामाजिक परिषद,कर्मयोगी फाउंडेशन महाराष्ट्र,अ.भा.महात्मा फुले समता परिषद,क्रांतीज्योती ब्रिगेड,भारतीय बारी महासंघ,महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था,राष्ट्रीय चर्मकार संघ,टिपू सुलतान मेमोरियल फाउंडेशन,मराठा सेवा संघ,मातृशक्ती महिला संघटना, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच व माझा मित्र परिवार इत्यादी सम विचारी संघटनांनी या आयोजनात भाग घेतला असून दोनही महामानावांची जयंती एकत्रित करण्याचे ठरविले आहे.
या निमित्य काही प्रबोधनात्मक,ज्ञानदानाचे कार्यक्रम होऊन समाजाला हितकारक ठरावे म्हणून गाढे अभ्यासक,विचारवंत,प्रसिद्ध व्याख्याते डॉ.नागेश गवळी,अहमदनगर यांना प्राचारण करण्यात आले आहे. कार्यक्रम अंजनगाव येथील संत गाडगे महाराज स्मारक प्रांगण,संगई प्लॉट,अंजनगाव येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.याप्रसंगी तालुक्यातील जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान प्रविणभाऊ पेटकर,विपुल नाथे,विदर्भकुमार बोबडे,पत्रकार गजानन चांदूरकर,गजानन कविटकर,अनिल वर्हेकर,ललित ढेपे,सुरज पवार,प्रदिप अडगोकर,वासुदेवराव काळे,शशिकांत नवले,विनोद हाडोळे, बाळासाहेब गोंडचवर,प्रदिप देशमुख,अनिल जुनघरे यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
